महाराष्ट्र ग्रामीण

पालकमंत्री प्रकाश आबिटकर शेतीच्या बांधावर: भर पावसात केली भात रोपांची लागण!

राधानगरी (विलास पाटील ) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ‘एक दिवस बळीराजासोबत’ या मोहिमेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात उतरून भात रोपांची लागण केली. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत ‘एक दिवस, माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत त्यांनी शेतकऱ्यांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.


पालकमंत्री आबिटकर यांनी डोक्यावरील येरलं बाजूला ठेवून, भर पावसात भिजत शेततात पावर टिलरद्वारे मशागत केली आणि वाफ्यांमध्ये भात रोपांची लागण केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून झुणका भाकरी आणि ठेच्याची चव चाखत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शेतीच्या बांधावर उतरून त्यांनी शेतीशी आपली नाळ जोडली आणि शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी व समस्या समजून घेतल्या.


यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन पीक उत्पादन वाढीसाठी यापुढेही असे उपक्रम राबवण्यात येतील. तसेच, त्यांनी परिसराला लाभलेल्या नैसर्गिक वारशाबद्दल अभिमान व्यक्त केला.
याप्रसंगी राधानगरी-कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तहसीलदार अनिता देशमुख तसेच कृषी, महसूल व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button