महाराष्ट्र ग्रामीण

राधानगरी पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरीचे 02 गुन्हे उघड; 9,50,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त!

राधानगरी :(प्रतिनिधी): मागील दोन वर्षात राधानगरी पोलीस ठाणे हद्दीतील शेतामध्ये काम करणा-या गोर गरीब, मजूर वयस्कर महिला सौ. सोनाबाई मारुती पाटील वय 65, (रा. सावर्डे पाटणकर, ता. राधानगरी) व सौ. मंगल तुकाराम नरके वय 60, (रा. चक्रेश्वरवाडी, ता. राधानगरी) यांना मारहाण करून त्यांच्या गळयातील सोन्याचे चिताक जबरीने चोरुन नेलेल्या घटना घडल्या होत्या. त्या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते, तसेच चोरटयाने रेन कोट परिधान करून आपली ओळख उघड होणार नाही याची खबरदारी घेवून चोरीचे गुन्हे केले होते यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणणे आव्हानात्मक होते. मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या होत्या. सदर पथकामार्फत जबरी चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास सुरु असताना पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार व सागर माने यांना राधानगरी येथील जबरी चोरीचे गुन्हे संशयित आरोपी नामदेव पाटील (रा. चक्रेश्वरवाडी, ता. राधानगरी ) हा आयडीला कॉलनी जवळ, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर येथे स्पेंडर मोटार सायंकारलवरून फिरत असलेच गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर, सदर संशयिताला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 90 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे 02 चिताक व एक मोटर सायकल असा एकूण 9,50,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी व जप्त मुद्देमाल तपासकामी राधानगरी पोलीस ठाणेच्या ताब्यात देणेत आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेशकुमार गुप्ता साो, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री आण्णासाहेब जाधव सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री बी. धीरजकुमार साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. संतोष गळवे, पोलीस अंमलदार संजय कुंभार, सागर माने, संजय देसाई, लखनसिंह पाटील, महेश पाटील, महेश से विजय इंगळे, शुभम संकपाळ, संदिप बेंद्रे, विशाल चौगले, संजय हुंबे, अशोक पोवार, प्रकाश पाटील,: सर्जे, सागर चौगले, सुशील पाटील, हंबीरराव अतिग्रे यांचे पथकाने केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button