महाराष्ट्र ग्रामीण

उदगाव येथे एसटी बस थांबवल्याने चालकावर हल्ला; सरकारी कामात अडथळा!

शिरोळ कोल्हापूर (सलीम शेख) : उदगाव एसटी स्टँड येथे प्रवाशाला घेण्यासाठी बस थांबवल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने एसटी बस चालकावर लोखंडी टॉमीने हल्ला करत जखमी केले. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून एसटीचा वेळ वाया घालवला. ही घटना आज, ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मेहबूब मौला गोलंदाज (वय ४१, रा. न्यू इंग्लिश स्कूल, हिंदवीनगर, शिरोळ) हे एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहेत, तर महेश संजय गावडे हे वाहक आहेत. आज सकाळी ११.३० च्या सुमारास उदगाव एसटी स्टँड येथे वाहक महेश गावडे यांनी बेल दिल्याने चालक मेहबूब गोलंदाज यांनी त्यांच्या ताब्यातील एमएच ४० एन ९२५७ क्रमांकाची एसटी बस थांबवली.
याच वेळी कैलास दत्तात्रय रसाळ (वय २६, रा. न्यू टिंबर मार्केट एरिया, संभाजी कॉलनी, सांगली) हा त्याच्या एमएच १० सीआर ३२९३ क्रमांकाच्या छोटा हत्ती टेम्पोने पाठीमागून येऊन बससमोर उभा राहिला. त्याने चालक मेहबूब गोलंदाज यांना “तू गाडी आडवी का मारलास, शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने छोटा हत्तीतील लोखंडी टॉमी काढून मेहबूब गोलंदाज यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारून त्यांना जखमी केले. तसेच वाहक महेश संजय गावडे यांच्या डाव्या हातावरही टॉमीने मारहाण केली, ज्यामुळे त्यांना मुक्का मार लागला.
या घटनेमुळे सरकारी कामात अडथळा निर्माण होऊन एसटीचा वेळ वाया गेला, असे फिर्यादी मेहबूब गोलंदाज यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात हजर राहून दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पो.हे.कॉ. जाधव करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button