महाराष्ट्र ग्रामीण
ढगफुटी सदृश्य पावसामुळे वाहून गेलेल्या अमन भालदारच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत!

सरनोबतवाडी (सलीम शेख ) : काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सरनोबतवाडी येथील ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या १२ वर्षीय अमन भालदार या शाळकरी मुलाच्या कुटुंबीयांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून ४ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे ही मदत अमनच्या उजळाईवाडी कोर्ट कॉलनी येथील कुटुंबीयांना मिळाली.
या दुर्घटनेत अमन भालदार याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला होता. या कठीण प्रसंगात शासनाकडून मिळालेली ही मदत कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा देणारी ठरेल.