तामगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्रात गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात संपन्न!

तामगाव( सलीम शेख ) : डीएमआर फाउंडेशन ट्रस्ट संचलित श्री स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी सकाळपासूनच केंद्राचे संचालक, सभासद वर्ग आणि स्वामी भक्त स्वामीसेवेत मग्न होते.
सकाळी श्री स्वामी पादुका व स्वामी मूर्तीस संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक रणजित दुर्गुळे यांच्या हस्ते आणि सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर, सकाळी ११:१५ वाजता सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थितीमध्ये स्वामींची आरती करून सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
यावेळी अनेक स्वामी भक्तांनी सहकुटुंब आणि सहपरिवार येऊन श्री स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला. उपस्थित भक्तांना लाडू, केळी आणि बटाटा वेफर्सचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमा सोहळ्यानिमित्त स्वामी भक्तांना गुरु-शिष्य परंपरेबद्दल मार्गदर्शनही करण्यात आले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डीएमआर फाउंडेशन आणि सेवा केंद्राचे कार्याध्यक्ष अनिल खामकर, उपाध्यक्ष जितेश तटकरे, खजिनदार युवराज देसाई, संदेश दिवेकर, अजय देसाई, समर्थराज दुर्गुळे, साईराज दुर्गुळे तसेच फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी दुर्गुळे, उपाध्यक्ष संगीता पाटील, सेक्रेटरी मालती सावंत, खजिनदार वर्षा सुर्वे, युवराज देसाई, सुधाकर यादव, रवी तटकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी महिला संचालिका सीमा साळोखे, नम्रता देसाई, रुपाली शिंदे, सुनीता पाटील, रेश्मा काळे, सुप्रिया संकपाळ, शैला मंडे, नम्रता कोथळे, रंजना खराडे, अश्विनी काटकर, भावना तटकरे, दीपा दिवेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी युवराज देसाई यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि स्वामी भक्तांचे आभार मानले.