माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात शालेय वस्तूंचे वाटप!

कोल्हापूर (सलीम शेख ) : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ, जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. ‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपून, संघटनेने विविध शाळांमध्ये शालेय वह्या आणि खाऊ वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली.
त्रिंबोली विद्यालय, विक्रमनगर कन्या शाळा, उचगाव मंगेश चौक येथील अश्या एकूण ५ शाळामध्ये तसेच बागल विद्यालय हायस्कूल या सर्व शाळांमध्ये सुमारे १००० वह्यांचे वाटप करण्यात आले. वह्यांसोबत विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या सामाजिक कार्याबद्दल शालेय मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाने शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश परमार यांच्या अध्यक्षतेखाली अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये तालुकाप्रमुख दत्ताजी फराकटे, बाळासाहेब नलवडे, विक्रमजी चौगुले, भाऊ चौगुले, बंडा पाटील, सोहेल कदम, मनीषा खोत , दिपाली शिंदे , वनिता सातपुते, शिवम परमार, बिरू फराकटे आणि ओमकार फराकटे यांचा समावेश होता.
या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.