जिल्हाधिकारी सभागृहच्या प्रवेश द्वारात ‘अशोक स्तंभ राजमुद्रा’ च्या ऐवजी ‘सेंगोलची’ जाहिरात फलक तात्काळ काढा: वंचित बहुजन आघाडी

प्रतिनिधी (कोल्हापूर): वंचित बहुजन युवा आघाडी कोल्हापूर शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी महाराणी ताराराणी सभागृह च्या प्रवेश द्वारात अशोक स्तंभ राजमुद्रा च्या ऐवजी सेंगोल ची जाहिरात व लावलेले फलक याबाबतचे प्रदर्शन त्या ठिकाणी पुढे महिनाभर हे प्रदर्शन चालू राहणार होते गेले आठवडाभर हे प्रदर्शन सुरू होते आज वंचित बहुजन युवा आघाडी कोल्हापूर शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातून जाहिरात व लावलेले फलक तात्काळ हटवणे बाबत आज उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी सो यांना निवेदन दिले असता निवेदन पर जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी लावलेले सेंगोल हे अधिकृत आहेत का तसेच त्या ठिकाणी लावलेले प्रदर्शन हे दिशाभूल करणारे डिझायनिंग असून ते काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला तसेच पोलीस प्रशासन व माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख अधिकारी अडसूळ साहेब यांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर वरिष्ठांकडून माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या मात्र वंचित बहुजन आघाडीचे भूमिका अशी होती की तात्काळ ते हटवावे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे तो कदापिही खपून घेणार नाही व भारतीय संविधान जिंदाबाद भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणाबाजी सुरू झाल्या त्यानंतर पोलीस बंदोबस्त तसेच प्रमुख अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तेथील डिझाईन बॅनर हटवण्यासाठी सांगितले व ते अधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेवून ते काढून घेतले व पुढील निर्णय आम्हाला कळवतो असे सांगितले यानंतर वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा हे निदर्शनास आले तर वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने पुन्हा उधळून लावण्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा अध्यक्ष मिलिंद सनदी,कोल्हापूर शहराध्यक्ष अमित नागटिळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, महासचिव डॉक्टर आकाश कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, करवीर तालुकाध्यक्ष नितीन कांबळे, करवीर उपाध्यक्ष सचिन कांबळे, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, महाबोधी पद्माकर संतोष पवार कागल तालुकाध्यक्ष आशिष कांबळे