वडगाव विद्यालय, ज्युनिअर कॉलेज पेठवडगावमध्ये इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत!

पेठवडगाव (सुभाष भोसले ) : शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित वडगाव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठवडगाव येथे इयत्ता ११वीच्या नवीन विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आर. आर. पाटील, उपमुख्याध्यापिका एस. एस. पाटील, पर्यवेक्षक एम. व्ही. बारवडे, आणि कौन्सिल सदस्य ए. ए. पन्हाळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुख्याध्यापिका आर. आर. पाटील आणि उपमुख्याध्यापिका एस. एस. पाटील यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहार व पेन भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक एस. आर. पाटील यांनी केले, तर पी. बी. कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. यु. पाटील यांनी केले. या स्वागत समारंभाचे नियोजन एस. बी. गोणी यांनी केले होते.
या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. तसेच, शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते व पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई (दीदी), प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे, कौन्सिल सदस्य बाळ डेळेकर, कौन्सिल सदस्य मा. ए. ए. पन्हाळकर, शाळा कमिटीच्या चेअरमन प्रणिता सालपे, वरिष्ठ लिपिक के. बी. वाघमोडे यांचे प्रोत्साहन मिळाले. मुख्याध्यापिका आर. आर. पाटील, उपमुख्याध्यापिका एस. एस. पाटील, पर्यवेक्षक एम. व्ही. बारवडे यांचे बहुमोल मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले.
या कार्यक्रमाबद्दल सर्व विद्यार्थी, पालक वर्ग आणि माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.