सह्यगिरी परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांना छत्र्या व रेनकोटचे वाटप!

राधानगरी (विलास पाटील) : सह्यगिरी परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यात शाळेसाठी दूरवरून ये-जा करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या आणि रेनकोटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम साळवण बाजारपेठेतील श्रीकांत कुंभार यांचे चिरंजीव स्वरूप यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राबवला जातो. यावर्षी या उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते.
यावेळी विद्या मंदिर मणदूर, केंद्र शाळा मांडूकली, आंबेवाडी आणि विद्या मंदिर कोनोली (ता. राधानगरी) येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सह्यगिरी परिवारातर्फे छत्र्या आणि रेनकोट वाटप करण्यात आले.
कोनोली शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. भाटले सर आणि मणदूर शाळेचे मुख्याध्यापक श्रीपती तेली सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. “ही केवळ छत्री नसून, पावसाळ्यात या मुलांच्या डोक्यावर धरलेले मायेचे छत्रच आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच, त्यांनी सह्यगिरी परिवाराचे आभार मानले.
या प्रसंगी सह्यगिरीचे कार्यवाहक डी. एस. पाटील सर, संजय देसाई, विश्वास भोसले, रेखा पाटील, मारुती साबळे, ए. बी. पाटील सर, एस. डी. अस्वले सर, रंजना गुरव, समिधा पवार, रामेश्वर विभुते, सतीश चौगुले आणि गजानन कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.