किरकोळ कारणावरून एकाला मारहाण – दोघांवर गुन्हा दाखल

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कणेरीवाडी येथील विकी नारायण गुरव (वय २३, रा. कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ०५.०८.२०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास माधवनगर गणपती मंदिरासमोर त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनिल ईश्वर सावंत आणि रणजित ईश्वर सावंत (दोघे रा. कणेरी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे दोघे सख्खे भाऊ आहेत.गुन्हा दाखल होण्याचं कारण म्हणजे यातील फिर्यादी विकी गुरव हे त्यांचे मित्र विरेंद्र पाटील यांच्यासोबत माधवनगर गणपती मंदिराजवळील कॉंक्रीटच्या कामाच्या ठिकाणी होते. त्यावेळी विरेंद्र पाटील यांचा आरोपींसोबत काहीतरी वाद सुरू होता. तो सोडवण्यासाठी विकी गुरव मध्ये पडले असता, आरोपी अनिल सावंत याने तिथे असलेल्या लाकडी दांड्याच्या लोखंडी खोऱ्याने विकी यांच्या पाठीवर आणि पायावर मारून त्यांना जखमी केले. तसेच, त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनाही शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेची तक्रार विकी गुरव यांनी पोलिसांत दिल्यानंतर, दि. ०६.०८.२०२५ रोजी सकाळी ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास गोकुळ पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार रसाळ करत आहेत.