कागलमध्ये दुर्मिळ सुरवंटाचे दर्शन; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कागल (सलीम शेख) : कागल येथील गणेश नगरमध्ये राहणाऱ्या ताशिलदार कुटुंबियांच्या अंगणात एका दुर्मिळ आणि आकर्षक सुरवंटाचे (Caterpillar) दर्शन झाले आहे. काळा आणि लालसर नारंगी रंगाच्या शरीरावर पांढऱ्या ठिपक्यांनी सजलेला हा सुरवंट पाहण्यासाठी कुटुंबातील अनेकांनी गर्दी केली होती. महंमद ताशिलदार, जाहगिंर ताशिलदार आणि शकिल ताशिलदार या तीन कुटुंबियांनी आपल्या अंगणात हा अनोखा पाहुणा पाहिला.महंमद ताशिलदार यांची नात जोया हिने
त्यांनी लगेच त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडिया ग्रुप्सवर शेअर केले. त्यानंतर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. विकिपीडियावरील माहितीनुसार, हा सुरवंट फुलपाखरे किंवा पतंग यांच्या जीवनचक्रातील एक अवस्था आहे.
सामान्यतः झाडांची पाने खाऊन वाढणारा हा सुरवंट नंतर कोषात जातो आणि त्यातूनच सुंदर फुलपाखरू किंवा पतंग बाहेर येते. या दुर्मिळ किड्याला पाहण्यासाठी परिसरातील लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. निसर्गातील या अनोख्या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.