रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

कागल (सलीम शेख ) : नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिरात रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
अपघातमुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा घेतली.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरचे निरीक्षक तेजस डोळ यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे नियम समजावून सांगितले आणि अपघातमुक्त भारतासाठी प्रतिज्ञा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीबाबत शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली.
शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मोठा सहभाग होता .या कार्यक्रमात जाधव आणि मकानदार यांनीही विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे विविध पैलू स्पष्ट केले. शाळेचे मुख्याध्यापक सागर नदाफ, शिक्षण विभाग प्रमुख पॉल सोनुले, केंद्रप्रमुख पवार सर यांच्यासह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेची जाणीव करून देण्यात आली.
या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता वाढली असून, भविष्यात ते जबाबदार नागरिक म्हणून वाहतुकीचे नियम पाळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.