महाराष्ट्र ग्रामीण
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी अभियान, राष्ट्रपतींना निवेदन पाठवणार!

कोल्हापूर (सलीम शेख): महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या स्वाक्षरी अभियानाने मोठी गती घेतली आहे. या अभियानांतर्गत देशभरातील २ लाख ४ हजार ४२१ लोकांच्या सह्या असलेले फॉर्म घेऊन कार्यकर्त्यांनी आज नांदणी मठाकडे प्रयाण केले.
नांदणी मठाचे महास्वामीजी यांच्या हस्ते या स्वाक्षरी केलेल्या सर्व फॉर्मचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता रमणमळा पोस्ट ऑफिस, कोल्हापूर येथून हे सर्व फॉर्म भारताच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत.
या वेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महादेवी हत्तीणीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे.