पट्टणकोडोलीमध्ये ‘श्री संत बाळूमामा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल’चे उद्घाटन!

पट्टणकोडोली (सलीम शेख ) : येथील श्री संत बाळूमामा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि आमदार अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उद्घाटन सोहळ्याला अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, सरपंच नम्रता माळी, अर्जुन शिंगारे, डॉ. राजपूत, डॉ. शिंगे, डॉ. थोरात, उपजिल्हाप्रमुख स्वामी सर, शिव कामगार सेनेचे आनंदा मोरे, संदीप तोडकर, महेश नाझरे, किसन तिरपणकर, अशोक हुपरे, शिवाजी डावरे, पोपट कांबळे, प्रकाश जाधव, सतीश हुपरे, मारुती रांगोळे, प्रकाश पाटील, राम शिंगारे, शिवा स्वामी यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.