महाराष्ट्र ग्रामीण

घराघरात लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटणार, भारताला सबळ करणारा अर्थसंकल्प, एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानासंह अर्थमंत्र्यांचे मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde on Union Budget 2025 : देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने घराघरात लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषमा केल्या आहेत. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत असे एकनाथ शिंदे म्हणाले. एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, आणि महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांना मोठा लाभ होणार

शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत.

कर्करोगाच्या औषधांवर पूर्णतः शुल्क माफी

निर्मला सीतारामन यांनी आरोग्य अर्थसंकल्पाबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात रुग्णांना, विशेषतः कर्करोग आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्यांना मदत करण्यासाठी 36 जीवनरक्षक औषधांना मूलभूत सीमाशुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. या सोबतच कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डे-केअर सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सांगितले. जेणेकरून कर्करोगाच्या रुग्णांना विशेष काळजी घेता येईल. कॅन्सर हा इतका घातक आणि प्राणघातक आजार आहे. परिणामी हा रोग रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अशा सर्वच बाजूंनी हानी पोहोचवतो. मात्र आता सरकारतर्फे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डे-केअर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्याद्वारे रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना उपचारासोबतच मानसिक आधार आणि व्यावहारिक मदतही दिली जाईल. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना जलद पुनर्प्राप्त करण्यात मदत करू शकते आणि वेळ आणि पैसा वाचवू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button