कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ् संचालकपदी आनंदा रत्नाप्पा व्हसकोटी संचालकपदी यांची निवड!

प्रतिनिधी – (सुभाष भोसले) कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ् संचालकपदी आनंदा रत्नाप्पा व्हसकोटी ( पेरणोली हायस्कुल पेरणोली ता. आजरा ) यांची संचालक मंडळाच्या बैठकीत निवड करण्यात आली . हि निवड शिक्षक नेते दादासाहेब लाड यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आली.
यावेळी चेअरमन राजाराम शिंदे, व्हा चेअरमन शरद तावदारे,संचालक बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे , दत्तात्रय घुगरे, अनिल चव्हाण , उत्तम पाटील, मदन निकम, श्रीकांत कदम, श्रीकांत पाटील , सुभाष खामकर , अविनाश चौगले , दिपक पाटील , राजेंद्र पाटील , जितेंद्र म्हैशाळे,प्रकाश कोकाटे, पांडुरंग हळदकर , मनोहर पाटील , सचिन शिंदे , सौ .ऋतुजा पाटील , शितल हिरेमठ आदीसह सी ई ओ जयवंत कुरडे, डे. सी.ई.ओ. उत्तम कवडे , संगणक अधिकारी नितीन शिंदे उपस्थित होते
निवडीनंतर तज्ञ् संचालक व्हसकोटी यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला .
स्वाभिमानी आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांबरोबर काटकसरीचा व आदर्शवत असा पारदर्शी कारभार करण्यासाठी कटीबद्द राहीन असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना आनंदा व्हसकोटी यांनी केले .