पारंपारिकतेला फाटा देत ‘सेंटर फॉर रेनेसाँ’चे कोल्हापुरात उद्घाटन,महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटकातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

कोल्हापूर (हेरले) (सलीम शेख) : महाराष्ट्राच्या विविध विभागातून आणि कर्नाटक, गोवा येथून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त लोकसहभागातून ‘सेंटर फॉर रेनेसाँ’ या संस्थेचे हेरले (जि. कोल्हापूर) येथे आज (दिनांक) उद्घाटन झाले. पारंपारिकतेला फाटा देत झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळींतील कार्यकर्त्यांमधील तुटलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, साहित्य-संस्कृती, जात, धर्म, स्त्री-प्रश्न, पारलैंगिकता, सामाजिक सलोखा, माध्यमे यांसह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. भविष्यात या कार्यकर्त्यांना जोडणारा दुवा म्हणून ‘सेंटर फॉर रेनेसाँ’ काम करेल, असे आयोजकांनी सांगितले. या आवाहनाला नंदुरबार, मुंबई, पुणे, ठाणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच बेळगाव आणि गोवा येथून तीनशेहून अधिक सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती फातिमाबी हाशीम मनगोळी यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून झाली. त्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेत कॉम्रेड संपत देसाई यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सतीश लोंढे (अलिबाग) यांनी ‘रेनेसाँ’ हे नाव घेऊन हुमायून मुरसल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचललेल्या धाडसी पावलाचे कौतुक केले आणि ही चळवळ एकत्रितपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. संस्थेचे प्रमुख हुमायून मुरसल यांनी ‘सेंटर फॉर रेनेसाँ’ महाराष्ट्रातील समाजोपयोगी सामाजिक चळवळींना जोडण्याचे काम करतात