महाराष्ट्र ग्रामीण
कोल्हापूर जिल्हात उद्यापासून रमजान रोजे सुरू!

कोल्हापूर (सलीम शेख) : चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्यामुळे कोल्हापुरात उद्या, रविवार, दि. २ मार्चपासून रमजान रोजे सुरू होत असल्याचा निर्णय हिलाल कमिटीच्या बैठकीत (चांद कमिटी) उलमा हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी शुक्रवारी जाहीर केला.
रोजाच्या निमित्ताने शुक्रवारी सायंकाळच्या मगरीब नमाजानंतर येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या हिलाल कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीत मुंबई हिलाल कमिटीसह सर्व शहरातील हिलाल कमिटी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. या ठिकाणाहून चंद्रदर्शनाची साक्ष मिळालेली नाही.
याप्रसंगी मौलाना इरफान कासमी, मौलाना नाझिम पठाण, मौलाना अब्दुल सलाम कासमी, मौलाना अ. र. नाईकवडे, काझी अशरफ, हाफीज समीर, ज. जाफरबाबा सय्यद, मौलाना अब्दुल बाहिद सिद्दिकी, मुफ्ती ताहीर आदी उपस्थित होते.