जयसिंगपूरच्या 175 डंपर चालकांना मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांचा मदतीचा हात!

जयसिंगपूर(सलीम शेख) : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी जयसिंगपूर शाखेतील 175 डंपर चालकांना एक वर्ष मोफत अपघात विमा (ॲक्सिडेंट क्लेम) देण्याचे आश्वासन दिले आहे.
डंपर चालक हे नेहमीच धोकादायक परिस्थितीत काम करत असतात. अनेकदा त्यांना अपघातांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चालकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी हा मदतीचा हात पुढे केला आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना राजू जाधव म्हणाले, “डंपर चालक बांधव हे रात्रंदिवस मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना एक वर्षाचा मोफत अपघात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे.”
यावेळी राहुल कुंभार, परशुराम चव्हाण, गायकवाड, तुषार चिक्कोडीकर आणि असंख्य डंपर चालक उपस्थित होते. चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.