भैय्याजी जोशी यांच्या विरोधात गोकुळ शिरगाव येथे ठाकरे गटाचे आंदोलन!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची आंदोलन.मुंबईतून मराठी भाषा हद्दपार करण्याचा भाजपचा कुटिल डाव मोडून काढण्यासाठी व भैयाजी जोशीने मराठी भाषा बद्दल अपशब्द वापरले यासाठी निषेद करण्यात आला.यावेळी शिवसेनाचे संजय पवार म्हणाले की याच्या पाठीमागे कोण आहे हे शोधून काढले पाहिजे कोणीही उठतय मराठी भाषा, महाराष्ट्र, छत्रपती शिवा
जी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरतात व समाजात तेढ निर्माण करतात अशा घटनाचा व सरकारचा जाहीर निषेध. भैय्याजी जोशी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर ही कुणाची अवलाद आहे यांची चौकशी करा. ही भावी काळात कोल्हापुरात आली तर यांना कोल्हापुरी हिसका दाखवू असे ते म्हणाले. यावेळी मोठमोठ्याने निर्दशने देण्यात आली व भैय्याजी जोशी यांच्या प्रतिमेला कोल्हापुरी पायताणे जोडे मारण्यात आली. ही निर्देशने एमआयडीसी फाट्याच्या जवळील शिवसेनेच्या फलकाजवळ देण्यात आले. यावेळी गोकुळ शिरगाव पोलीस केंद्राचा बंदोबस्त होता
. ही निर्दशने रस्त्याच्या एका बाजूला शांततेत देण्यात आले. यावेळी शिवसेनाचे संजय पवार, विजय देवणे, अवधूत साळोखे,विनोद खोत, शंकर खोत, शांताराम पाटील, दत्ता पाटील, संतोष जाधव, सुरेश पाटील,राजू यादव, रोनक भि
डे, महादेव कुकडे अशरफ पकाली, सातापा गाडेकर,भारत खोत, तानाजी म्हाकवे,दिलीप पाटील, महिलावर्ग व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.