महाराष्ट्र ग्रामीण
जागतिक महिला दिनानिमित्त राजारामपुरी पोलीस ठाण्याचा कारभार महिलांच्या हाती!

कोल्हापूर (सलीम शेख) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजारामपुरी पोलीस ठाण्यातील सर्व कारभार महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला होता. महिला कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या संधीमुळे त्या खूप आनंदी होत्या.
हा कारभार सुप्रिया दुरंदे (डेली ऑफिसर- आय.पी.एस) श्रुती कांबळे (सीसीटीएनएस), नाजनीन देसाई (ठाणे अंमलदार), जयश्री पाटील (कारकून),सुप्रिया कचरे (क्राईम),प्रतिभा पेटकर (कोर्ट पैरवी),संगीता विटे (गार्ड अंमलदार),अरुणा सरदेसाई (वायरलेस)
या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचा कारभार यशस्वीरित्या सांभाळला.या संधीबद्दल महिला कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले. महिला दिनानिमित्त मिळालेल्या या संधीमुळे त्यांच्या कामाला अधिक प्रोत्साहन मिळाले, असे त्यांनी सांगितले.