कणेरीमठ येथील घरगुती वीज बिल वसुलीवरून वाद, महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कणेरी मठावरील घरगुती वीज बिल वसुलीवरून वाद निर्माण झाला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (एमएसईबी) कर्मचारी संजय कोळी आणि शुभम सुतार हे अमर डाफळे यांच्याकडे तीन महिन्यांचे थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी गेले होते. मात्र, डाफळे यांनी दोन महिन्यांचेच बिल थकीत असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि डाफळे यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वीज बिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे योग्य नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी संजय कोळी आणि शुभम सुतार हे अमर डाफळे यांच्याकडे तीन महिन्यांचे थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी गेले होते. अमर डाफळे यांनी दोन महिन्यांचेच बिल थकीत असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि अमर डाफळे यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.वीज बिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे योग्य नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया
वीज बिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे योग्य नाही.”अमर डाफळे यांनी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून चूक केली आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकातून होत आहे.अशा घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होते.