नव्या बाइकच्या चावीसोबत एक स्पेशल कोड का दिला जातो ?, 99 टक्के लोकांना माहित नसते, जाणून घ्या!

आपण जेव्हा एखादी नवी कोरी बाइक खरेदी करतो तेव्हा त्यासोबत साहजिकच आपल्याला दोन नवीन चाव्या दिल्या जातात पण या चावीसोबत आणखी एक छोटीशी प्लेट असते. या प्लेटवर एक खास नंबर असतो. याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसतं. या चावीवर खास असा बाइकची ओळख म्हणजे (VIN) Vehicle Identification Number कोड असतो. या चावीचा उपयोग फक्त अधिकृत डिलरकडून जेव्हा नवीन चावी तयार केली जाते तेव्हा वापरला जातो. बऱ्याच लोकांना मात्र या नंबरची फारशी कल्पनाच नसते.
मुळात डिलरकडून जेव्हा तुम्ही बाइक खरेदी करतात तेव्हा नवी कोरी चावी दिली जाते. ही चावी तुमच्या बाइकची सुरक्षा वाढवते. जर तुमची चावी हरवली किंवा चोरीला गेली तर कुणीही या नंबरच्या विना नवीन चावी तयार करू शकत नाही. फक्त अधिकृत डिलरच या नंबरचा वापर करून तुम्हाला नवीन चावी तयार करू देतो.
तुमची बाईक सुरक्षित हातात आहे याची खात्री करून, फक्त अधिकृत डीलर्सच या कोडचा वापर करून नवीन चावी बनवू शकतात. जर तुम्हाला कधीही नवीन चावी बनवायची असेल, तर तुम्हाला तुमच्या अधिकृत डीलरला हा विशेष कोड द्यावा लागेल. या कोडचा वापर करून डीलर तुमच्या बाईकसाठी नवीन चावी बनवू शकतो.
त्यामुळे, जेव्हा बाइक घेतली तेव्हा हा नंबर कुठेही फेकून देऊ नका. हा विशेष कोड जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या बाईकच्या कागदपत्रांसोबत ठेवा किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा. तुमचा विश्वास नसलेल्या कोणासोबतही हा कोड शेअर करू नका. पण अलीकडे काही बाइक उत्पादक हा कोड वेगळ्या कार्डवर किंवा चावीसोबत दिलेल्या कागदपत्रात देतात. जर तुम्ही तुमची बाइक खरेदी केली आणि तुम्हाला हा कोड दिला नसेल, तर तुमच्या डीलरशी संपर्क साधा. त्याच्याकडून हा नंबर नक्की मागवून घ्या