महाराष्ट्र ग्रामीण

एस. फोर. ए. विकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन प्राधिकरण परिपत्रकात दुरुस्तीसह प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवा.

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण परिपत्रकात दुरुस्ती करून तो प्रस्ताव त्वरित मुख्यमंत्र्यांना पाठवावा, या मागणीचे निवेदन एस. फोर. ए. विकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना आज येथे देण्यात आले. याप्रश्नी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करावी. अन्यथा १४ एप्रिलपासून दसरा चौकात बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणकडून अद्याप कोल्हापूर महापालिकेसह ४२ गावांची प्रगती झालेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीचे संचालक भूषण गगराणी, सोनिया सेठी, किरण कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कॅबिनेट बैठकीत चर्चा होऊन प्राधिकरण आदेशात बदल होणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी संदर्भात बैठक आयोजित करावी लागेल.
यावेळी राजू माने, बबन शिंदे, फिरोज शेख, रुपेश घडशी, दत्तात्रय माने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button