प्राचार्या श्रीमती डाँ. सुनिता सुरेश लकाडे यांना अन्नपूर्णा मानिनी आवार्ड पुरस्कार!

कागल: (सुभाष भोसले) दि कागल एज्यूकेशन सोसायटी संचयित बी. एड. का़ँलेज च्या प्राचार्या डॉ सुनिता लकाडे यांना व सहाय्यक प्राध्यापिका आर. के पाटील मॅडम , तसेच का़लेजची विद्यार्थीनीं यांना अन्नपूर्णा इन्स्टिटय़ूट आँफ मैनेजमेंट रिसर्च सेंटर हुक्केरी संकेश्वर बेळगाव यांचे वतीने दिला जाणारा अन्नपूर्णा मानिनी अवार्ड् पुरस्कार मिळाला. विविध क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ महीलांना जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी बी एड काँलेजच्या प्राचार्या, प्राध्यापिका, व काही विद्यार्थीनींना हा पुरस्कार मिळाला. त्यामध्ये बी.एड. विद्यार्थीनीं सायली डावरे, मनिषा डावरे, वृशाली खोत, निशिगंधा मोरे , स्वाती कोंडेकर यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांचे संस्थेच्यावतीने, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी यांचे वतीने हार्दिक अभिनंदन करणेत आले
व पुढील वाटचालीस शुभेच्छा देणेत आल्या
यांना संस्थेचे सचिव प्रताप उर्फ भैय्या माने, यांची प्रेरणा, संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांचे मार्गदर्शन, व संचालक बिपिन माने यांचे सहकार्य लाभले तसेच विभाग प्रमुख शंकर संकपाळ यांचे प्रोत्साहन मिळाले. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे