कुरुंदवाडचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ बापूसो ढालाईत (मामा) यांना सामाजिक कार्यासाठी पुरस्कार!

इचरकरंजी (सलीम शेख) : इचलकरंजी येथील आधार बहुउद्देशीय संस्थेने कुरुंदवाडचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ बापूसो ढालाईत (मामा) यांना सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरवले. ढालाईत मामांनी सामाजिक स्तरावर अनेक गरजू लोकांना मदत केली आहे आणि लोकांची अनेक कामे मार्गी लावली आहेत.
ढालाईत मामा त्यांच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या या स्वभावामुळे हजारो नागरिक त्यांच्या कार्याची प्रशंसा करत आहेत. ढालाईत मामांनी सामाजिक कार्यासाठी दिलेले योगदान हे समाजासाठी प्रेरणादायी आहे.
या पुरस्काराबद्दल बोलताना ढालाईत मामा म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. मी नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही करत राहीन.”
ढालाईत मामांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
ढालाईत मामांच्या भावी कार्यासाठी हजारो नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.