गोकुळ शिरगावमध्ये महा ई-सेवा केंद्रांची लूट, नागरिकांची गैरसोय!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव परिसरात महा ई-सेवा केंद्रांवर नागरिकांची मोठी लूट होत आहे. रेशनकार्ड, लाल बावटा, बांधकाम कामगार नोंदणी अशा विविध कामांसाठी 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत अवाजवी रक्कम घेतली जात आहे. पैसे देऊनही कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. काही केंद्रांमधील कर्मचारी ‘सर्व्हर डाऊन’चे कारण सांगून टाळाटाळ करतात, तर काहींची नागरिकांशी वाद घालण्याची आणि उर्मट भाषा वापरण्याची वृत्ती आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही लूट कधी थांबणार?
या महा ई-सेवा केंद्रांची तपासणी करून कारवाई कधी होणार?
प्रशासन नागरिकांची ही गैरसोय कधी दूर करणार? असे अनेक प्रश्न जनतेतून होत आहेत.भागातील नागरिकांची मागणी गोकुळ शिरगावजवळील 10 ते 15 गावांमध्ये 20 ते 25 महा ई-सेवा केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांची तातडीने तपासणी व्हावी. प्रत्येक कामाचे दरपत्रक केंद्रांवर लावावे आणि त्यावर अधिकाऱ्यांची सही असावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.प्रशासनाकडे लक्ष घालणार का?
या तक्रारींवर प्रशासन काय भूमिका घेते आणि नागरिकांना न्याय मिळवून देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.