गोकुळ शिरगावच्या तनया पाटील यांचे वैद्यकीय क्षेत्रात यश!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगावच्या तनया शैलजा पांडुरंग पाटील यांनी कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. या यशाबद्दल गावात आनंद व्यक्त होत आहे.
तनया यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी चार वर्षे कठोर परिश्रम घेतले. तसेच १ वर्ष लातूरला विशेष अभ्यास केला होता.त्यांच्या यशात आई-वडिलांचे मोठे योगदान आहे.तनया यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नं.१ येथे तर माध्यमिक शिक्षण श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल गोकुळ शिरगाव येथे झालेले आहे .
तनया यांच्या यशाबद्दल गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला आर.पी.आय.चे बबनराव शिंदे, पंचायत समिती सदस्य साताप्पा कांबळे, टी.के. पाटील, प्राचार्य के.डी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य शामराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तनया यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत.