महाराष्ट्र ग्रामीण

कागलमध्ये शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा!

कागल (सलीम शेख) : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, बुधवारी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती. शेतकऱ्यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन आपला विरोध नोंदवला.

नामदार हसन मुश्रीफ यांनी या महामार्गाला विरोध केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी कोल्हापूर दौऱ्यात हा महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.आता पुन्हा शासन हा महामार्ग करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.शिंदे यांनी कोल्हापूरला येण्यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा 5 तारखेला त्यांचा दौरा रोखण्याचा इशारा शक्तिपीठ विरोध समिती देण्यात आला आहे.हा महामार्ग गरज नसताना तयार केला जात आहे‌ असे शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले.माजी आमदार संजय घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक अंबरीश घाटगे, विजय देवणे, शिवाजी मगदूम, गिरीश फोडे यांच्यासह अनेक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.शेतकऱ्यांनी न्यायप्रिय मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


विजय देवणे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या भूमिकेचे कौतुक केले आणि महामार्गाला विरोध कायम राहील, असे सांगितले.
या मोर्चात मोठ्या संख्येने महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांनी ‘शक्तिपीठ मार्गास विरोध’ लिहिलेले फलक आणि टोप्या घातल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर जमून हा मोर्चा प्रशासकीय भवनाकडे निघाला.नंतर तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन आपला विरोध नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button