महाराष्ट्र ग्रामीण
कणेरीतील एस. पी. सोलरचे सचिनकुमार पाटील यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार!

गोकुळ शिरगाव( सलीम शेख) : प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचे सर्वाधिक इन्स्टॉलेशन केल्याबद्दल कणेरी येथील एस. पी. सोलरचे सचिनकुमार अशोक पाटील यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी अजिंक्यतारा कार्यालय येथे त्यांचा सत्कार केला.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सचिन पाटील यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सचिन पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचे आभार मानले.
या सत्काराप्रसंगी कणेरी ग्रामपंचायतीचे सदस्य बबन बंडू केसरकर, बाबासाहेब पाटील, गणेश पाटील, प्रकाश कांबळे, पृथ्वीराज पाटील, स्वराज पाटील, महेश जाधव, संजय जावळे, समर्थ केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.