Uncategorized
माणगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन!

माणगाव ( सलीम शेख ) : महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सन्मान भूमी, माणगाव येथे १४ एप्रिल रोजी रात्री ठीक १२ वाजता जयंती सोहळ्याची सुरुवात झाली. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव मा. सतीश माळगे (दादा) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदराने अभिवादन केले.
यावेळी सतीश माळगे यांनी उपस्थित सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. माणगाव येथे दरवर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधून मोठ्या संख्येने भीम अनुयायी ज्योत प्रज्वलित करून आपल्या गावी घेऊन जातात. यावर्षीही सतीश माळगे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.