Uncategorized

डी.एम.आर. फाउंडेशनला नारीशक्ती पुरस्काराने गौरव!

तासगाव (सलीम शेख) : तासगाव येथील डी.एम.आर. फाउंडेशन या संस्थेला अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलन पुणे 2025 यांच्यामार्फत राष्ट्रीय स्तरावरचा प्रतिष्ठित “नारीशक्ती” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी रणजित दुर्गुळे यांच्या सामाजिक कार्याची आणि गरजू लोकांसाठी चालवलेल्या “एक हात मदतीचा” या उपक्रमाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
मीनाक्षी दुर्गुळे आणि संस्थेचे मार्गदर्शक रणजित दुर्गुळे यांच्या प्रेरणेतून डी.एम.आर. फाउंडेशन विविध सामाजिक कार्य करत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवा केंद्र, धार्मिक उपक्रम आणि बाल संस्कार शिबिरांचे आयोजन संस्थेद्वारे नियमितपणे केले जाते. महिलांसाठी राबवले जाणारे विविध उपक्रम आणि संस्थेचे उत्कृष्ट सामाजिक कार्य यामुळेच यावर्षी डी.एम.आर. फाउंडेशनला नारीशक्ती पुरस्काराचा मान मिळाला आहे.
काल पुणे येथील आचार्य अत्रे कला मंदिरात आयोजित एका शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्याला आणखी बळ मिळाले असून, यापुढेही चांगले सामाजिक कार्य करण्याचा मानस मीनाक्षी दुर्गुळे यांनी व्यक्त केला आहे.
हा पुरस्कार डी.एम.आर. फाउंडेशनचे सर्व स्वामीभक्त, सुवर्णपेढीचे ग्राहक आणि संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक हितचिंतकाला समर्पित करत असल्याचे मीनाक्षी दुर्गुळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button