करवीर मतदारसंघातील रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवा; आमदार चंद्रदीप नरके यांची सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना!

कोल्हापूर (सलीम शेख ) : करवीर मतदारसंघातील राज्य आणि जिल्हा महामार्गावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण आणि पॅचवर्क करून बुजवावेत, अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, तसेच अपघातांची संख्याही वाढते, त्यामुळे या कामांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
आमदार चंद्रदीप नरके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत करवीर मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश आमदार नरके यांनी दिले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, एस. सी. बुरुड, आयरेकर, उपअभियंता देशपांडे मॅडम आणि उपअभियंता कांजर यांच्यासह विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.