मुरगूडमध्ये नामदार चषक 2025 राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे थाटामाटात उद्घाटन

मुरगूड (ता. कागल) पत्रकार (सुभाष भोसले): येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेत राज्यभरातून ४५० पैलवानांनी सहभाग घेतला आहे.
उद्घाटन सोहळ्यात:
– प्रतिमापूजन तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते
– ध्वजारोहण प्रांताधिकारी प्रसाद चौगले यांच्या हस्ते
– दीपप्रज्वलन केडीसीसी संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक किसन चौगले, बिद्री साखर कारखान्याचे संचालक पंडीत केणे, बिद्री साखर उपाध्यक्ष मनोज फराकटे यांच्या हस्ते
– मॅटपूजन गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ आणि अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते
या प्रसंगी नविद मुश्रीफ, अंबरिषसिंह घाटगे, प्रताप उर्फ भैय्या माने आणि दिग्विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेत पंच म्हणून संदीप पाटील, बाबा शिरगावकर, आनंदा गोडसे, आकाश नलवडे, वैभव तेली, महेश पाटील आणि पांडूरंग पुजारी यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे स्वागत माजी नगरसेवक दिगंबर परीट यांनी केले, सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले आणि आभार डॉ. सुनिल चौगुले यांनी मानले.