हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या तेरवाड शाखेचा थाटामाटात उद्घाटन समारंभ संपन्न!

तेरवाड तालुका शिरोळ (सलीम शेख) : हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या तेरवाड शाखेचा उद्घाटन समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभहस्ते या शाखेचे फीत कापून उदघाटन करण्यात आले.
अतिशय कमी वेळेत लोकांचा विश्वास संपादन करणाऱ्या हेरवाड पतसंस्थेच्या या शाखेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रसायन खत मंत्रालय भारत सरकारचे संचालक डॉ. संजयदादा पाटील विराजमान होते.
या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक गोकुळचे संचालक व कुंभी कासारी सहकारी बँकेचे चेअरमन अजित नरके, कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे गोकुळचे संचालक एस आर पाटील, माणिकराव पोळ, दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिल यादव, जिल्हा परिषदेचे कासार तसेच यशस्वी पतसंस्था चालवणारे माळी बंधू – सुनील माळी व सुधीर माळी, तेरवाडचे सरपंच संजय अनुसे, हेरवाडचे सरपंच अर्जुन जाधव, हेरवाडचे प्रथमेश पाटील, आमगोंड पाटील, बंडू बरगाले यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांच्या सदिच्छा आणि उत्साहाच्या वातावरणात आज हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या तेरवाड शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या शाखेमुळे तेरवाड आणि परिसरातील नागरिकांना पतसंस्थेच्या विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.