महाराष्ट्र ग्रामीण

पंचायत समिती कागल येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण व सीपीआर प्रशिक्षण संपन्न!

कागल (सलीम शेख): कागल दि. ०१ मे: आज महाराष्ट्र दिनाच्या पावन दिनी पंचायत समिती कागल येथे प्रशासक तथा गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या शुभहस्ते सकाळी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी पंचायत समितीमधील सर्व विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.


ध्वजारोहणानंतर, उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि राज्याच्या प्रगतीमध्ये ज्यांनी आपले बलिदान दिले, त्या हुतात्म्यांना आदराने स्मरण करून त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारूक देसाई यांनी एक महत्त्वपूर्ण आणि जीवनावश्यक प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) चे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि या गंभीर परिस्थितीत त्वरित आणि योग्य प्रतिसाद कसा द्यावा याबद्दल मार्गदर्शन केले. हृदयविकाराचा झटका आल्यास किंवा श्वासोच्छ्वास थांबल्यास सीपीआरच्या मदतीने रुग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात, याची माहिती डॉ. देसाई यांनी दिली. कर्मचाऱ्यांनीही या प्रात्यक्षिकात सक्रिय सहभाग घेतला.


या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी मान. गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद तारळकर, बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह पंचायत समितीमधील अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित या ध्वजारोहण आणि सीपीआर प्रशिक्षणामुळे पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button