महाराष्ट्र ग्रामीण

तळसंदे येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा संपन्न!

तळसंदे ता. हातकणंगले (सलीम शेख ): कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने तळसंदे येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांची तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांनी अध्यक्षस्थान भूषवले.


कार्यशाळेत बोलताना आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांनी शेतकऱ्यांना खरीप पिकांची निवड, योग्य बियाणे, खत आणि पाणी व्यवस्थापन तसेच इतर आवश्यक माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले.
यावेळी गटविकास अधिकारी हातकणंगले शबाना मोकाशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास माने, उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे प्रमुख जयवंत जगताप, तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे, सोयाबीन तंत्रज्ञान व्याख्याते जमदग्नी, सिद्द, पी. बी. पाटील, विश्वास माने यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button