महाराष्ट्र ग्रामीण

कागल चेक पोस्टजवळ रात्री आंब्यांनी भरलेला ट्रक पलटी; चालकाला किरकोळ दुखापत!

कागल (सलीम शेख ) : कोल्हापूर-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील कागल चेक पोस्टजवळ रात्री सुमारे १० वाजता आंब्यांनी भरलेला ट्रक क्रमांक TN-40-AB-8778 पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक केरळ येथून आंब्यांची खेप घेऊन मुंबई – वाशी मार्केटला जात होता. कागल चेक पोस्ट समोर वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ट्रकमधील आंबे होते हे कोणाला माहीत नव्हते.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यात सहभाग घेतला. किरकोळ जखमी झालेल्या ट्रक चालकाला प्राथमिक उपचार देण्यात आले.


दरम्यान, या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत कागल पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. चेक पोस्ट कर्मचीरी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केले .अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र आता ती हळूहळू सुरळीत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button