शिये येथे भव्य वारकरी संमेलनाचा सांगता समारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न!

शिये (सलीम शेख): शिंदे येथे वै. ह.भ.प. गुरुवर्य विवेकानंद वासकर महाराज गुरुकुल, कोल्हापूर आणि विठ्ठल भजनी मंडळ शिये यांच्या संयुक्त विद्यमाने शिये येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य वारकरी संमेलनाचा सांगता समारंभ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
वारकरी संप्रदाय आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे असलेले भावनिक नाते सर्वश्रुत आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी पंढरीच्या वारीसाठी नेहमीच शक्य ते सहकार्य केले आहे. आषाढी एकादशीच्या काळात उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः पंढरपूरला भेट देऊन तेथील व्यवस्था व उपाययोजनांची पाहणी केली, याची आठवण उपस्थितांनी आवर्जून काढली.
आज आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून उपमुख्यमंत्री शिंदे या वारकरी संमेलनाला उपस्थिती दर्शवली, यावरून त्यांची वारकरी संप्रदायाबद्दल असलेली आत्मीयता स्पष्टपणे दिसून आली.
या महत्त्वपूर्ण संमेलनाला कणेरी मठाचे मठाधीपती काडसिद्धेश्वर स्वामीजी, स्वामी मंगलगिरीजी, विठ्ठल महाराज चवरे, भागवत महाराज हांडे, माधवदास राठी महाराज यांसारख्या संत-महंतांची तसेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, उद्योग सेनेचे उदय सावंत, कार्यक्रमाचे संयोजक राणा महाराज वासकर, गोकुळ संचालक अजित नरके, एस. आर. पाटील आणि मोठ्या संख्येने वारकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे या संमेलनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आणि वारकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. उपमुख्यमंत्री शिंदे वारकरी संप्रदायाच्या कार्याचे कौतुक केले आणि यापुढेही शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या भव्य वारकरी संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वै. ह.भ.प. गुरुवर्य विवेकानंद वासकर महाराज गुरुकुल आणि विठ्ठल भजनी मंडळ शिये यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.