महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापुरात मर्दानी खेळांचे यशस्वी प्रशिक्षण शिबिर संपन्न!

कोल्हापूर (सलीम शेख ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शाखा सिद्धाळा गार्डन येथे आयोजित ज्येष्ठ वस्ताद कै. सूर्यकांत तांबेकर यांच्या स्मरणार्थ शिवकालीन युद्धकला (मर्दानी खेळ) प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. हे शिबिर ५ मे ते १५ मे या दरम्यान शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

शिबिराच्या सांगता समारोहास कोल्हापूर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, माजी स्थायी समिती सभापती सचिनभाई चव्हाण, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष प्रतिज्ञा उत्तुरे, महिला शहर प्रमुख रिमा देशपांडे, माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, स्वप्ना शिंदे, शिवगर्जना महानाट्याचे निर्माते स्वप्नील यादव, स्वाती इंडस्ट्रिजचे रणजित जुगदार, रिक्षासेनेचे उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोसले, शिवआरोग्य सेनेचे विकिभाई मोहिते, गोविंदभाई वाघमारे, दिपक गौड, जुना बुधवार मर्दानी आखाड्याचे वस्ताद योगेश पाटील, महेश पाटील व चेतन नलवडे यांसारख्या अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


या दहा दिवसांच्या शिबिरात पुणे, मुंबई, शिर्डी, सोलापूर आणि गुजरात येथील मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शिर्डी येथील अथर्व कारंडे आणि पुण्यावरून आलेली अद्विका नलावडे यांनी उत्कृष्ट प्रावीण्य दाखवत ‘उत्कृष्ट शिबिरार्थी’चा मान पटकावला.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना लाठी काठी, तलवार, पट्टा, घोडेस्वारी, रायफल शूटिंग आणि गिर्यारोहणातील झुमरिंग यांसारख्या विविध मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण देण्यासाठी अभिषेक पाटील, प्रेम तडवळे, सुजित पाटील, निखिल पोवार, अवधूत गोसावी, सुमित चव्हाण, शिवाई पोवार, किरण पोवार, संजय बागल आणि प्राजक्ता बागल या प्रशिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.
शिवसेना उपशहर प्रमुख दिनेश साळोखे आणि नितीश तांबेकर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरामुळे युवकांना आपल्या पारंपरिक युद्धकलांची माहिती मिळाली आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्याची प्रेरणा मिळाली, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button