हंचिनाळ (के.एस.) येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठान व धम्म परिषदेचे आयोजन.. समस्त बौद्ध समाज हंचिनाळ!
बेळगाव जिल्हा पालकमंत्र्यासह कर्नाटक महाराष्ट्र अनेक मान्यवर राहणार उपस्थित..
हंचिनाळ (सलीम शेख) : हंचिनाळ (केएस ) ता.निपाणी येथील बुद्ध विहार येथे बुद्ध जयंतीचे औचित्य साधून रविवार दि 18 रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हा धम्म सोहळा भिक्खु संघाच्या दिव्य सानिध्यात होणार असून या कार्यक्रमाला पु.भदंन्त आर.आनद थेरो (अध्यक्ष पच्शिम महाराष्ट्र भिखू संघ ) पु.भदंन्त प्रा.डाॅ यश कश्यपायन(जयसिंगपूर PH.D )पु.भदंन्त एस.सबोधी थेरो(आम्रपाली बुध्द विहार वसगंडे ) पु.भदंन्त गोविदो मानदो (आम्रपाली बुध्द विहार वसगंडे)बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी, खासदार प्रियांका जारकिहोळी, महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शशिकला जोल्ले,माजी मंत्री विरकुमार पाटील, युवा नेते उत्तम पाटील मलेश चौगुले बेळगाव जिल्हा दलित नेते डॉ .आंबेडकर विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश कांबळे रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे कागल नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर,अजित कांबळे नगरसेवक विवेक लोटे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांच्याकडून देण्यात आली आहे. सदर कार्यक्रम तिन सत्रात होणार असुन सकाळच्या सत्रात बुद्ध व आंबेडकर मूर्तीचे मिरवणूक व प्रतिष्ठापना होणार आहे. तर दुसऱ्या सत्रात प्रमुख मान्यवरांचे मनोगत व धम्मदीक्षा व सायंकाळी 6.00 वाजता भिम शासन बुद्ध भिम गीतांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमाला निपाणी भागातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.