कणेरीवाडी येथे ‘रेन बो वॉटरपार्क’चा शानदार शुभारंभ!

कणेरीवाडी (इरफान मुल्ला ) : करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथे प्रशांत वाळवेकर आणि संतोष वाळवेकर (रा. कागल) यांनी नव्याने सुरू केलेल्या ‘रेन बो वॉटरपार्क’चे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
मंत्री मुश्रीफ यांच्याकडून कौतुक
उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाळवेकर बंधूंना शुभेच्छा दिल्या आणि स्थानिक उद्योजकांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. “या उपक्रमामुळे स्थानिक पर्यटन क्षेत्राला नवे आयाम प्राप्त होतील,” असे प्रतिपादन मंत्री मुश्रीफ यांनी केले. या वॉटरपार्कमुळे परिसरातील पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्राला नवीन बळ मिळेल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘रेन बो वॉटरपार्क’ची वैशिष्ट्ये
वाळवेकर यांनी वॉटरपार्कविषयी माहिती देताना सांगितले की, ‘रेन बो वॉटरपार्क’ हे कणेरीवाडी परिसरातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरेल. या वॉटरपार्कमध्ये विविध प्रकारच्या जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स), स्लाइड्स आणि स्विमिंग पूल यांसारख्या अनेक मनोरंजक सुविधा उपलब्ध आहेत. हे वॉटरपार्क पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना एक उत्तम मनोरंजनाचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.