महाराष्ट्र ग्रामीण

मे महिन्यात राऊतवाडी धबधबा प्रवाहित, पर्यटकांचे आकर्षण; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा!

राऊतवाडी (सलीम शेख): साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा मध्यंतरी प्रवाहित होणारा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ओढे, नाले आणि नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. याच कारणामुळे काही ठिकाणी धबधबे प्रवाहित झाले असून, त्यापैकी राऊतवाडी धबधब्याने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे.


अकाली प्रवाहित झालेल्या या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी काही नागरिक आकर्षित होऊन तिकडे गर्दी करू लागले आहेत. धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


मात्र, प्रशासनाने या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने आणि आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने, कोणत्याही निसर्गरम्य स्थळी किंवा धोकादायक ठिकाणी जाण्यास प्रशासनाने मनाई दर्शवली आहे. नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निसर्गाचा आनंद घेताना कोणतीही जोखीम पत्करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button