महाराष्ट्र ग्रामीण

कागल येथील ATM मध्ये बनावट नोटा जमा झाल्याने खळबळ; तपास सुरू!

कागल (सलीम शेख): कागल येथील येस बँकेच्या एटीएममध्ये मशीनद्वारे भरणा करण्यात आलेल्या ११ हजार ५०० रुपयांमध्ये ५०० रुपयांच्या ९ नोटा बनावट आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना १५ मे रोजी येस बँक, कागल शाखा, रिंग रोड, सागर बेकरी जवळ येथे घडली.
या प्रकरणी मनोज कुमार पाच्छापुरे (रा. महावीर नगर, हुपरी) यांनी रविवार, २५ मे रोजी कागल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रिंग रोड कागल येथील सागर बेकरी जवळ असलेल्या येस बँकेच्या एटीएममध्ये एका अज्ञात व्यक्तीने ५०० रुपयांच्या २३ नोटा, म्हणजेच एकूण ११ हजार ५०० रुपये जमा केले होते. मात्र, जमा केलेल्या २३ नोटांपैकी ९ नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पाच्छापुरे यांनी तातडीने कागल पोलिसांत धाव घेतली.
या घटनेमुळे एटीएममध्ये पैसे जमा करण्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरमोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बनावट नोटा जमा करणारा अज्ञात व्यक्ती कोण आहे आणि यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button