कोडोलीत प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाचा ६ वा वर्धापनदिन उत्साहात

कोडोली (सलीम शेख ) : पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेला सदिच्छा दिल्या आणि वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या वर्धापनदिन सोहळ्यात माउंट अबू येथील राजयोगी छोटेलाल भाई, शमा बहेन, प्रतीक्षा बहेन, तेजू बहेन यांच्यासह कोडोली गावच्या सरपंच सुनिता बाजीराव केकरे, उद्धव पाटील, विजय पाटील, सर्जेराव केकरे, प्रकाश मोरे आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाने समाजात शांतता, बंधुत्व आणि आध्यात्मिक जागृतीसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा देत पुढील वाटचालीस भरभरून यश मिळो अशी प्रार्थना करण्यात आली.