शिवाजी तरुण मंडळाने पटकावला शारंग चषक: अंतिम सामन्यात बुधवार पेठवर २-१ ने मात

कोल्हापूर (सलीम शेख ) : कै. वसंतराव जयवंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री नेताजी तरुण मंडळाने आयोजित केलेल्या ‘शारंग चषक’ फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आज मोठ्या उत्साहात पार पडला. हा अत्यंत चुरशीचा सामना शिवाजी तरुण मंडळ आणि बुधवार पेठ या बलाढ्य संघांमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये शिवाजी तरुण मंडळाने २-१ अशा फरकाने विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले.
अंतिम सामन्याला मोठ्या संख्येने फुटबॉलप्रेमी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमंत खासदार शाहू महाराज जी, माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी महापौर निलोफर आजरेकर, शारंग देशमुख, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, अरुणराव जाधव, कल्याणराव निकम, अभिजीत खतकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी तरुण मंडळ आणि बुधवार पेठ यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरला. दोन्ही संघांनी विजयासाठी सर्वस्व पणाला लावले होते, मात्र अखेर शिवाजी तरुण मंडळाने बाजी मारत प्रेक्षकांची मने जिंकली. या विजयामुळे शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडू आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कै. वसंतराव जयवंतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेला कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.