Uncategorized
कोल्हापुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार! ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी!

कणेरी (इरफान मुल्ला) : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला होता, ज्यामुळे शहर आणि ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत होते, अक्षरशः एका तासाच्या पावसाने परिस्थिती बिकट झाली होती. यामुळे गोकुळ शिरगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर, विशेषतः कणेरी फाटा आणि एमआयडीसी फाट्यावर वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
या अभूतपूर्व परिस्थितीमुळे नागरिकांना तासभर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शेकडो वाहने आणि हजारो नागरिक या अचानक आलेल्या संकटात अडकून पडले होते, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.