महाराष्ट्र ग्रामीण
धुंदवडे प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा!

धुंदवडे (विलास पाटील) : धुंदवडे ता. गगनबावडा येथील प्राथमिक शाळेमध्ये ढोल ताशा लेझीम पथकाच्या गजरात
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . विद्यार्थ्यांना पुस्तके, कपडे , बूट वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पाटील होते . प्रास्ताविक मुख्याध्यापक विश्वनाथ चौगले यांनी केले . गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला . कार्यक्रमास संजय पाटील
मारुती पाटील , मुख्याध्यापक विश्वनाथ चौगले, संभाजी कांबळे , सागर पाटील, सौ .सरिता देसाई , नवनाथ लिंगायत ,ऋतुराज बामणीकर, संभाजी पाटील , अनिल लटके, रघुनाथ दळवी ,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व सर्व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .