सांगवडेवाडी विद्या मंदिरात नवोदित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत!

सांगवडेवाडी (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी विद्या मंदिर शाळेत पहिली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेत प्रवेश करणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शाळा आकर्षकपणे सजवण्यात आली होती.
प्रवेशोत्सवावेळी मुलांना रंगीबेरंगी फुगे आणि टोप्या वाटण्यात आल्या. तसेच, उपस्थित विद्यार्थ्यांना गोड खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेतील या उपक्रमामुळे मुलांचे शाळेविषयीचे प्रेम वाढेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल, असे मत शाळा समितीचे व ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य यांनी व्यक्त मत केले.
यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापनाने गावातील पालकांना आवाहन केले की, मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्यावा जेणेकरून शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.कार्याकमाचे प्रास्ताविकात व मान्यवरांच्या स्वागत मुख्याध्यापक डिग्रजकर सर यांनी केले.आभार देवरकर सर यांनी आभार मानले.वेळी कार्यक्रमास उपस्थित पंचायत समिती अधिकारी चौधरी, लोक नियुक सरपंच सुदर्शन खोत, ग्रा.सदस्य पोपर सिद्धनुर्ले ,बाबुराव आगणे ‘ चौगुले वहिनी, प्रतिष्ठित नागरीक सुनिल खोत, शितल खोत,राजु पाटील, विनोद चौगुले,मुख्याध्यापक डिग्रजकर . देवडकर सर, लोहार मॅडम, मुल्ला सर शिक्षण समिती अध्यक्ष महावीर खोत उपा. अध्यक्ष मिनाक्षी जाधव, शिक्षण समिती सदस्य गुरव वहिती वाडीकर वहिनी, अजित कुरणे नितीन माने ,राहूल गणमाळे शिक्षण तज्ञ सतिश चव्हाण उपस्थित होते.यावेळी सुदर्शन खोत यांच्या वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या वह्या मुलांना वाटण्यात आल्या.