Uncategorized
उजळाईवाडी येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत एकाला अटक!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील उजळाईवाडी हद्दीत पोलिसांनी कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर कारवाई केली आहे. या कारवाईत ऋतिक हिरालाल लोखंडे (वय २४, रा. अण्णा भाऊ साठेनगर, पेठ, ता. वाळवा) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी ऋतिक लोखंडे हा टेम्पो क्रमांक एमएच ०९-सीयू ६९९२ मधून सहा गायी आणि चार बैल कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात होता. गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पोलिसांनी उजळाईवाडी हद्दीत सापळा रचून हा टेम्पो थांबवला.
तपासात, चालक ही जनावरे इस्लामपूर येथून संकेश्वर येथे घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ ऋतिक लोखंडे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार भवारी करत आहेत.